१ ते ८च्या विद्यार्थ्यांना २७ला शालेय पुस्तकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST2021-09-27T04:37:51+5:302021-09-27T04:37:51+5:30

गटशिक्षणाधिकारी कार्यालयास शासनाकडून प्राप्त झालेली ही पुस्तके २५ सप्टेंबर, रोजी तालुक्यातील एकूण १२ केंद्रांवर पोहोच करण्यात आली असल्याची माहिती ...

Distribution of school books on 27th to students from 1st to 8th | १ ते ८च्या विद्यार्थ्यांना २७ला शालेय पुस्तकांचे वाटप

१ ते ८च्या विद्यार्थ्यांना २७ला शालेय पुस्तकांचे वाटप

गटशिक्षणाधिकारी कार्यालयास शासनाकडून प्राप्त झालेली ही पुस्तके २५ सप्टेंबर, रोजी तालुक्यातील एकूण १२ केंद्रांवर पोहोच करण्यात आली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी तुकाराम आदबने यांनी दिली.

मराठी व उर्दू माध्यमांच्या तालुक्यातील एकूण १६९ शाळांसाठी प्राप्त झालेली १ लाख २ हजार ८५४ पाठ्यपुस्तके २७ला वितरित केली जाणार आहेत.

ग्रामीण भागातील इयत्ता ८ वी ते १२ पर्यंत शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र, सिंदखेडराजा एकमेव नगरपालिका असतानाही इतर काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामागे स्थानिक कारणे असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आल्यामुळे दिवाळीच्या नंतर सर्वच शाळा सुरू होतील, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

गटशिक्षणाधिकारी तुकाराम आदबने यांच्या मार्गदर्शनाखाली गट समन्वयक संतोष सोनुने, विषय तज्ज्ञ प्रवीण गवई, विनोद कंकाळ, पद्माकर गवई, किरण वहिले यांच्यासह रामचंद्र वाघमारे, स्वरूपा बोने आदींनी केंद्र स्तरापर्यंत पुस्तके पोहोचविली असल्याचे, शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

सर्वच शाळा सुरू होण्याची अथवा दिवाळीपर्यंत वाट न पाहता, सध्या ग्रामीण भागातील ज्या शाळा सुरू आहेत, तेथे प्राधान्याने पुस्तके देण्यात यावीत, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप मानतकर, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष टी.के. देशमुख यांनी केली आहे.

वरिष्ठांचे आदेश व त्या परिस्थितीनुसार प्रत्येक शाळेतील इयत्ता १ ते ८वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

- तुकाराम आदबने, गटशिक्षणाधिकारी, सिंदखेडराजा.

Web Title: Distribution of school books on 27th to students from 1st to 8th