तंटामुक्त गावांना पुरस्कार धनादेशाचे वितरण

By Admin | Updated: March 4, 2015 01:50 IST2015-03-04T01:50:59+5:302015-03-04T01:50:59+5:30

खामगाव उपविभागात ३२ गावांना ९२ लाख २५ हजारांचा निधी वितरित.

Distribution of award checks to tantamukta villages | तंटामुक्त गावांना पुरस्कार धनादेशाचे वितरण

तंटामुक्त गावांना पुरस्कार धनादेशाचे वितरण

खामगाव (जि. बुलडाणा) : उपविभागातील खामगाव व शेगाव तालुक्यातील तंटामुक्त मोहिमेत यश मिळविणार्‍या ३२ गावांना ३ मार्च रोजी स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालय आवारात पुरस्काराच्या रकमेचे वितरण करण्यात आले. यावेळी अशा पुरस्कारप्राप्त गावांना एकूण ९२ लाख २५ हजार रुपयांच्या पुरस्कार धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी जी. श्रीधर, तहसीलदार अशोक टेंभरे खामगाव, तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी शेगाव, गटविकास अधिकारी प्रकाश वाघ खामगाव, गटविकास अधिकारी तायडे शेगाव, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील आदींची मंचावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमात खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणा कारेगाव तंटामुक्त समितीला ३ लाख ७५ हजार तसेच शिरजगाव देशमुख, संभापूर, बोरी अडगाव, शहापूर येथील तंटामुक्त समितीला प्रत्येकी ३ लाख, शेगाव ग्रामीण अंतर्गत येणार्‍या जवळा बु. व चिंचोली प्रत्येकी ४ लाख, जवळा पळसखेड, भोनगाव प्रत्येकी ३ लाख, गव्हाण, गौलखेड व लासुरा खुर्द प्रत्येकी २ लाख, टाकळी धारव १ लाख, हिवरखेड अंतर्गतील शिराळा १ लाख तर आसा, नायदेवी व वरणा प्रत्येकी २ लाख, पिंपळगाव राजा अंतर्गतील तांदुळवाडी-पोरज २ लाख ५0 हजार, काळेगाव, हिवरा खुर्द-उमरा, भंडारी प्रत्येकी २ लाख, ढोरपगाव, कुंबेफळ व जळका भडंग प्रत्येकी ३ लाख, कवडगाव-बेलखेड १ लाख, जलंब पोलीस स्टेशन अंतर्गतील जलंब व माटरगाव बु. प्रत्येकी ७ लाख, पहुरजिरा ५ लाख, लांजूड व टाकळी विरो प्रत्येकी ३ लाख, बेलुरा १ लाख अशा गावांना तंटामुक्त पुरस्कारांचे वितरण या कार्यक्रमांत करण्यात आले.

Web Title: Distribution of award checks to tantamukta villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.