शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे १२ टक्केच वाटप

By admin | Updated: June 6, 2015 00:57 IST

राष्ट्रीयकृत बँकांचा खो; पुनर्गठनालाही लागणार वेळ.

बुलडाणा: मान्सून उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. पेरणीपूर्व मशागत आटोपली असताना शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते, पेरणीसाठी पीककर्जाची नितांत गरज आहे. जिल्हाधिकारी यांनी पीककर्ज वाटपाचे नियोजन करून देत प्रत्येक बँकेला उद्दिष्ट दिले आहे; मात्र ३१ मे पर्यंत केवळ १२ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी पीककर्ज वाटपाला चालना दिली नाही. जिल्ह्यात १ हजार २५0 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे नियोजन असून, आतापर्यंत केवळ १५५ कोटी रुपयांचे खरीप पीककर्जाचे वाटप केले आहे. हे प्रमाण केवळ १२ टक्के एवढेच आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंत केवळ १0 टक्के आणि ग्रामीण बँकांनी १२ टक्के कर्जवाटप केले आहे. खरीप २0१५-१६ करिता १२५0 कोटी इतका पीककर्ज वाटपाचा लक्षांक आहे. या तुलनेत २४ हजार १0२ शेतकर्‍यांना १५५ कोटी ८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. हे एकूण उद्दिष्टांच्या केवळ २६ टक्के इतके आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना खरिपासाठी १२५0 कोटी रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. त्या तुलनेत २४ हजार १0२ शेतकर्‍यांनाच १५५ कोटी ८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे; मात्र आतापर्यंत करण्यात आलेले कर्ज वाटप अत्यल्प असल्यामुळे येणार्‍या हंगामाच्या तयारीसाठी शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत.

*१५ जूनपर्यंत कर्जाचे पुनर्गठन अशक्य

मागील वर्षातील कर्जाचे पुनर्गठन पाच वर्षांसाठी १५ जूनच्या आत करण्यात येणार आहे. यासाठी राज्यशासनाचे आदेश तसेच नाबार्ड भारतीय रिझर्व बँक यांचे निर्देश आहेत. तथापि, बँकांची कर्जवाटपाची आजची स्थिती पाहता पुनर्गठन प्रक्रिया रखडलेली दिसून येत आहे.

*केवळ सहा कोटी रुपयांचे पुनर्गठन

    मागील वर्षातील कर्जाचे पुनर्गठन पाच वर्षासाठी १५ जूनच्या आत करण्यात यावे, असे आदेश असताना कर्मशियल बँकांचे कर्जवाटप उशिरा होते. कर्मशियल बँका पुनर्गठनाला वेळ लावतात, त्यामुळे हा कर्जवाटपाचा फरक आहे. मागील कर्जाचे पुनर्गठन १५ जूनपयर्ंत करण्याचे आदेश असताना वेळेच्या आत पुनर्गठन होईल किंवा नाही, याबाबत शंका आहे.