जळगाव, संग्रामपूर तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:49 IST2018-12-31T14:49:15+5:302018-12-31T14:49:39+5:30
संग्रामपुर : सोमवारी सकाळी सहा वाजता पासून संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

जळगाव, संग्रामपूर तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडीत
लोकमत न्युज नेटवर्क
संग्रामपुर : सोमवारी सकाळी सहा वाजता पासून संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याने अनेक व्यवसाय बंद राहणार आहे.
वरवट बकाल १३२ के.व्ही. वरून जळगाव व संग्रामपूर तालुक्याची जोडणी वेगवेगळी करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे विद्यूत पुरवठा खंडीत होईल याची पुर्वकल्पना देण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी सकाळपासूनच दोन्ही तालुक्यातील शेती पंप, पीठ गिरणी, अनेक लहान, मोठे उद्योग बंद होते. पाणीपुरवठा सुद्धा प्रभावित झाला होता. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठा बारा तास बंद राहणार आहे. संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर वरवट बकाल, पातुर्डा, टुनकी, सोनाळा येथील ३३ केव्ही सबस्टेशन बंद आहेत तर जळगाव जामोद शहरासह तालुक्यातील सर्व सबस्टेशन बंद आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. सोमवारी संध्याकाळी सहा वाजता दोन्ही तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती महावितरण कंपनीतील अधिकाºयांनी दिली.