गिऱ्हाईक पळविण्याच्या कारणावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:38 IST2021-09-21T04:38:43+5:302021-09-21T04:38:43+5:30

फिर्यादी महम्मद दानीश महम्मद सलीम (२२) यांच्या भावाचे आठवडी बाजारामध्ये चिकन शॉप आहे. त्यांच्या दुकानावर नेहमीचे गिऱ्हाईक आले असता ...

Dispute over the cause of the kidnapping | गिऱ्हाईक पळविण्याच्या कारणावरून वाद

गिऱ्हाईक पळविण्याच्या कारणावरून वाद

फिर्यादी महम्मद दानीश महम्मद सलीम (२२) यांच्या भावाचे आठवडी बाजारामध्ये चिकन शॉप आहे. त्यांच्या दुकानावर नेहमीचे गिऱ्हाईक आले असता आरोपी महम्मद मतीन महम्मद नजीर याने त्या गिऱ्हाईकाला हात पकडून त्याच्या दुकानावर नेले. याबाबत त्याला विचारले असता त्याने शिवीगाळ केली. तर याचवेळी महम्मद मतीन याचा मुलगा महम्मद मुजाहीद याने हातात मटण कापण्याचा सुरा घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन छातीवर वार केला. त्यामुळे फिर्यादी जखमी झाले. तर शेख अलीम शेख सलीम यानेही मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी मोहम्मद मुजाहीद मोहम्मद मतीन, शेख अलीम शेख सलीम, मोहम्मद मतीन मोहम्मद नजीर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Dispute over the cause of the kidnapping