बर्पाच्या गोळ्यातून विकला जातो आजार
By Admin | Updated: April 10, 2015 02:24 IST2015-04-10T02:24:38+5:302015-04-10T02:24:38+5:30
बुलडाणा जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या बर्फाची विक्री ; घातक रंगांचा वापर.
_ns.jpg)
बर्पाच्या गोळ्यातून विकला जातो आजार
खामगाव : कोणत्याही परवानगीविना निकृष्ट दर्जाच्या फेप्सीची (आइस कॅन्डी) शहर आणि परिसरात मोठय़ा प्रमाणात विक्री होत आहे, तर आइस गोळ्यासाठी वापरल्या जाणार्या रंगाचाही दर्जा आरोग्यास घातक आहे. त्यामधून आजारच विकला जात आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने ्रॅ्नॅवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शीतपेयांची विक्री वाढते. या गोष्टीचा नेमका फायदा घेत, कमी श्रमात, कमी गुंतवणुकीत अधिकाअधिक नफा कमविण्याच्या उद्देशाने काही जण शहरात निकृष्ट दर्जाच्या पेप्सीचा पुरवठा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. पूर्वीच्या काळी कांडी आणि बेरारची जागा आता फेप्सीने घेतली आहे. त्यामुळे पूर्वीचे कांडी आणि बेरार बनविण्याचे कारखाने आता कालबाह्य झाले असून, कमी जागेत, कमी खर्चांमध्ये फेप्सीचा व्यवसाय थाटला जातो. एक पॅकिंग मशीन आणि इतर किरकोळ साहित्याच्या जोरावर एका खोलीतच फेप्सीची निर्मिती होत असल्यामुळे कोणत्याही परवानगीविना शहरातील एका वस्तीमध्ये घरच्या घरी तीन-चार ठिकाणी फेप्सी निर्मितीचा व्यवसाय थाटण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव आढळून आले आहे. ह्यफेप्सीह्ण ४0 रुपये शेकडा! फेप्सीचे दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आढळून आले. लोकल दर्जाची पेप्सी ४0 रुपये शेकड्यापासून ५0 रु पयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे, तर काही नामांकित कंपन्यांचीही पेप्सी बाजारात आहे. या पेप्सीच्या शंभर नगांसाठी मात्र ७0-८0 रुपये मोजावे लागतात. व्यवसायातील माजिर्न कमी होत असल्यामुळे विक्रेते जास्त नफा मिळत असलेल्या, आरोग्याला घात असली तरी, अशा पेप्सीच्या विक्रीलाच अधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे. हा धोका उन्हाळ्यात प्रचंड वाढतो आहे.
ग्रामीण भागात घरीच तयार होते फेप्सी, आइस गोळा!
विक्री करण्यात येत असलेल्या फेप्सीवर निर्मितीची तसेच वापर करण्याची शेवटची दिनांक याबाबत कोणताही उल्लेख नाही. त्याशिवाय प्लास्टिकच्या थैलीत असलेली ही फेप्सी अनेक दिवस विक्रीअभावी पडून राहतात. त्यामुळे त्यात फंगस दिसून आले आहेत.
निकृष्ट दर्जाच्या पाण्यासह रासायनिक रंगांचा वापर!
शहर आणि परिसरात किरकोळ विक्रीसाठी तयार करण्यात येणारी फेप्सी (आइस कॅन्डी) रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने खाण्याचे प्रमाणित रंग, साखर महागले आहेत. फेप्सी तयार करण्यासाठी त्यांचा वापर केल्यास उत्पादनखर्च वाढतो. त्याच्या तुलनेत रासायनिक रंग आणि सॅकरीनचा वापर केल्यास निम्म्या खर्चात फेप्सी तयार होत असल्यामुळे निर्माते सर्रास रासायनिक रंग आणि सॅकरीनचा वापर करीत असल्याचे चित्र आहे.