शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

फळा-खडूऐवजी डिजीटल फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:56 IST

सावंगीमाळी येथील गावकर्‍यांच्या  सहकार्यामुळे दोन शिक्षकांनी गावच्या माळरानावर शाळे त नंदनवन फुलवून शाळा डिजिटल केली. सावंगीमाळी  येथील जि.प. मराठी प्राथमिक शाळा लोकसहभागातून  डिजिटल झाली असून, विद्यार्थ्यांना  शिक्षण आनंदीदायी  वाटत आहे. 

ठळक मुद्देलोकसहभागातून डिजिटल झाली जि.प. शाळा डिजिटलसाठी शाळेला दिला मदतीचा हात

ओमप्रकाश देवकर। लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : सावंगीमाळी येथील गावकर्‍यांच्या  सहकार्यामुळे दोन शिक्षकांनी गावच्या माळरानावर शाळे त नंदनवन फुलवून शाळा डिजिटल केली. सावंगीमाळी  येथील जि.प. मराठी प्राथमिक शाळा लोकसहभागातून  डिजिटल झाली असून, विद्यार्थ्यांना  शिक्षण आनंदीदायी  वाटत आहे. मेहकर तालुक्यातील सावंगीमाळी हे गाव ७२१ लोकसं ख्येचे  आहे. येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक  शाळेची स्थापना १९७९ ला झालेली आहे. या शाळेत  दोन शिक्षक  असून, मुख्याध्यापकपदी केशव दगडू  राजगुरू, सहायक अध्यापक मनीषा विठ्ठल भराड  कार्यरत आहेत. शाळेच्या विकासाकरीता गावकरी व  शिक्षकांनी नोकरीवर असलेल्या तरुणांचा सत्कार  समारंभ व प्रेरणा सभा आयोजित केली. या सभेमध्ये  उच्चशिक्षित तरुण व नोकरीला असणारे तरुण यांना या  दोन्ही शिक्षकांनी शाळेविषयी विकासात्मक सर्व बाबी  समजावून सांगितल्या. गावकर्‍यांनी याला दुजोरा देत युवा  पिढी समोर येऊन एकाच वेळेस सुमारे १ लाख १0 हजार  रुपये लोकवर्गणी जमा करून शाळेमध्ये रंगरंगोटी, दुरुस् ती, विद्युत कनेक्शन, इलेक्ट्रिक फिटिंग, पिण्याच्या  पाण्याची व्यवस्था, शाळेसमोरील मैदानाचे सपाटीकरण  यासारख्या छोट्या-छोट्या अनेक बाबी यांनी राबविल्या.  सावंगीमाळी येथील ग्रामपंचायतने पुढे येऊन दोन एलईडी  संच शाळेला भेट दिले. त्यामुळे आता दोन्ही शिक्षक सर्व  अभ्यासक्रम हा एलईडीवरच शिकवित आहेत. 

खासगी शाळेतील विद्यार्थी जि.प. शाळेतया दोन्ही शिक्षकांचे काम व शाळेची प्रगती पाहून खासगी  शाळेतील प्रवेश रद्द करून येथील पालकांनी आपली मुले  याच जि.प. शाळेत प्रवेशासाठी पाठविली. या शिक्षकांना  गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांचे मार्गदर्शन,  गावकरी, ग्रामपंचायत प्रशासन व शाळा समितीचे सर्व  सदस्य यांचे सहकार्य मिळत आहे.