सिंदखेड राजा (जि. बुलडाणा): : शहरासह व परिसरातील गावामध्ये अतिसाराची लागण झाली असून, ४ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची दिवसभर गर्दी होती. यामध्ये सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४१४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ७५ रुग्ण अतिसाराची लागण लागलेले असून, त्यांना उपचार करण्यासाठी भरती करून घेण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातील डॉ. गाणार यांनी दिली. पावसाळा सुरू असून, दूषित वातावरणाचा परिणाम, अशुद्ध पाणी पिल्यामुळे ३0 जून ते २ जुलैपर्यंत २00 रुग्णांवर तसेच खासगी रुग्णालयामध्ये अतिसाराची लागण झालेल्या रुग्णावर उपचार करण्यात आले. ४ जुलै रोजी बाजाराचा दिवस असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात सकाळपासूनच रुग्णांची गर्दी होती. दिवसभरात ४१४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ७५ रुग्ण अतिसाराचे असून, उपचार सुरु आहेत.
अतिसाराचे ७५ रुग्ण दाखल!
By admin | Updated: July 5, 2016 01:06 IST