धनगर समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: August 4, 2014 23:40 IST2014-08-04T23:40:54+5:302014-08-04T23:40:54+5:30
धनगर समाज बांधवांच्यावतीने ४ ऑगस्ट रोजी शहरातून मोर्चा काढण्यात आला.

धनगर समाजाचा मोर्चा
सिंदखेडराजा : धनगर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी धनगर समाज बांधवांच्यावतीने ४ ऑगस्ट रोजी शहरातून मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या राजवाड्यापासून ह्ययळकोट यळकोट जय मल्हारह्ण च्या घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. शेकडो महिला व पारंपारिक पोशाखासह खांद्यावर घोंगड्या घेऊन कपाळावर भंडारा लावून जयघोष व शासनाचा निषेध करीत सदर मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेचे प्रास्ताविक मोर्चाचे आयोजक फकीरा जाधव यांनी केले.
मोर्चात कोंडीबा जाधव, हेमराज म्हस्के, रामदास बनसोड, हरिदास म्हस्के, बाबासाहेब जाधव, भाऊ जाधव, डॉ.सदानंद बनसोड, अशोक जाधव, शंकर जाधव, अतुल भुसारी, सुरेश म्हस्के, कैलास मेहेत्रे, विठ्ठल पारेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. संचलन बाळू म्हस्के यांनी केले. मोर्चेकर्यांसोबत शेळ्यामेंढय़ा सुद्धा मोर्चात सहभागी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा मोर्चा पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.