धामणगाव बढे : ट्रॅक्टरच्या अपघातात एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:36 IST2017-12-18T00:36:01+5:302017-12-18T00:36:41+5:30
धामणगाव बढे : येथून जवळच असलेल्या पान्हेरा रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅ क्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

धामणगाव बढे : ट्रॅक्टरच्या अपघातात एक गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे : येथून जवळच असलेल्या पान्हेरा रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅ क्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
लालमातीजवळील सबस्टेशन किन्होळा येथे धामणगाव बढे महाराष्ट्र विद्युत मंडळ कर्मचारी सुरेश हिरालाल उईके (तंत्रज्ञ) हे कामानिमित्त ३३/११ केव्ही उपकेंद्र किन्होळा येथून पान्हेरा रोडवरून लालमातीकडे आपल्या दुचाकी मोटारसायकल क्र. एमएच २८- ८८४९ ने येत असताना लालमाती सबस्टेशनसमोर ट्रॅक्टर क्र. एमएच १९ - एएन ३६00 च्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून जखमी सुरेश उईके यांच्या मोटारसायकलला जबर धडक देऊन अपघात केला व जखमी केले. त्यांची प्रकृती चिं ताजनक असल्यामुळे बुलडाण्याहून अकोला येथे उपचारार्थ नेण्यात आले. सुरेश उईके हे गंभीर जखमी असल्याने ते फिर्याद देण्यास येऊ शकत नसल्याने या घटनेची फिर्याद कनिष्ठ अभियंता नीलेश डहाके यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विरुद्ध अप.नं. २१४/२0१७ कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.