धा. बढे पाणी पुरवठा योजनेची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST2021-03-21T04:34:07+5:302021-03-21T04:34:07+5:30

मागील सुमारे आठ ते दहा वर्षांपासून येथील ग्रामपंचायतकडे विद्युत बिल थकीत आहे. २० मार्च रोजी तो आकडा सुमारे ६० ...

Dha. More water supply schemes cut off power | धा. बढे पाणी पुरवठा योजनेची वीज तोडली

धा. बढे पाणी पुरवठा योजनेची वीज तोडली

मागील सुमारे आठ ते दहा वर्षांपासून येथील ग्रामपंचायतकडे विद्युत बिल थकीत आहे. २० मार्च रोजी तो आकडा सुमारे ६० लाखांच्या घरात गेला आहे. त्यात मागील दोन वर्षांपासून एक रुपयाही ग्रामपंचायतीने भरलेला नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. याविषयी वीज वितरण कंपनीचे अभियंता विवेक वाघ यांच्याशी संपर्क साधला असता पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यापूर्वी ग्रामपंचायतने थकीत बिलाचा भरणा करावा यासाठी वेळोवेळी नोटीस तथा कायदेशीर नोटीससुद्धा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. किमान चालू बिल तातडीने भरून विद्युत पुरवठा सुरळीत केला जाऊ शकतो. ग्रामपंचायत प्रशासन आता काय पावले उचलते, त्याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

परंतु अचानक पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांसमोर कोरोना काळात मात्र पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

Web Title: Dha. More water supply schemes cut off power