शालेय विद्यार्थ्यांचा पाेषण आहारच केला लंपास, देऊळगाव राजा शहरातील घटना

By संदीप वानखेडे | Published: December 29, 2023 06:54 PM2023-12-29T18:54:19+5:302023-12-29T18:54:55+5:30

अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Deulgaon Raja city, school students food stolen | शालेय विद्यार्थ्यांचा पाेषण आहारच केला लंपास, देऊळगाव राजा शहरातील घटना

शालेय विद्यार्थ्यांचा पाेषण आहारच केला लंपास, देऊळगाव राजा शहरातील घटना

देऊळगाव राजा : शहरातील शिवाजी हायस्कूल नगर परिषद मराठी प्रायमरी शाळा क्रमांक दोनमधील विद्यार्थ्यांना देण्यासाठी आलेल्या पोषण आहारातील कडधान्यासह इतर साहित्य एकूण किंमत ३७ हजार ८५२ रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. या प्रकरणी २९ डिसेंबर राेजी देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी हायस्कूल नगर परिषद मराठी प्रायमरी शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक करतार सिंग मोतीसिंग नायकडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील तांदूळ ३ क्विंटल ५५ किलो किंमत सहा हजार सातशे रुपये, गोडेतेल १९ किलो किंमत ३ हजार ९९० रुपये, मटकी ३६ किलो किंमत तीन हजार सहाशे रुपये, मूगडाळ ७६ किलो किंमत सहा हजार आठशे रुपये, मसूर डाळ ३० किलो किंमत दोन हजार २७०, वटाणा ८५ किलो किंमत सहा हजार ८१०, हळद पोषण आहार बनवण्यासाठी मसाला आणि इतर साहित्य असा एकूण ३७ हजार ८५२ रुपयांचा पोषण आहारच अज्ञात चाेरट्याने लंपास केला.

या प्रकरणी मुख्याध्यापकांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेकाॅ विश्वनाथ काकड करीत आहेत़.

Web Title: Deulgaon Raja city, school students food stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.