दरोड्यातील संशयीत ताब्यात

By Admin | Updated: January 3, 2015 00:56 IST2015-01-03T00:56:53+5:302015-01-03T00:56:53+5:30

हिवरखेड पोलिसांची कारवाई.

Detected suspects in the robbery | दरोड्यातील संशयीत ताब्यात

दरोड्यातील संशयीत ताब्यात

खामगाव (बुलडाणा): दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरू न हिवरखेड पोलिसांनी दोन आरोपींना रात्री ९ वाजता ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, नेरू शंकर चव्हाण वय ६५ व रविंद्र संगमा पवार वय २५ रा. दोघेही अंत्रज जिल्हा वाशिम अशी आरोपींची नावे आहेत. उपविभागिय पोलीस अधिकारी जी.श्रीधर यांचे पथक गस्तीवर असताना दोघेही संशयीतरित्या फिरत असल्याचे त्यांना दिसले. अनेक गुन्ह्यात या आरोपीचा सहभाग असल्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यत अटकेची कारवाई सुरू होती.

Web Title: Detected suspects in the robbery