शेंदुर्जन येथील धार्मिक स्थळाची विटंबना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST2021-01-21T04:31:11+5:302021-01-21T04:31:11+5:30

साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या शेंदुर्जन येथील एका युवकाने बस स्थानक परिसरातील एका धार्मिक स्थळाची विटंबना केली. या ...

Desecration of a religious place at Shendurjan | शेंदुर्जन येथील धार्मिक स्थळाची विटंबना

शेंदुर्जन येथील धार्मिक स्थळाची विटंबना

साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या शेंदुर्जन येथील एका युवकाने बस स्थानक परिसरातील एका धार्मिक स्थळाची विटंबना केली. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आराेपी युवकास ताब्यात घेतले आहे

शेंदुर्जन येथील राजेगाव राडला लागून एक धार्मिक स्थळ आहे. २० जानेवारी राेजी रात्री गावातीलच दत्तात्रय रघुनाथ मानवतकर याने या धार्मिक स्थळाची विटंबना केली. ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात येताच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार , ठाणेदार जितेंद्र आडोळे हे घटनास्थळी दाखल झाले . त्या ठिकाणी एक मोबाईल मिळून आला . त्या मोबाईलद्वारे तपास केला असता तो दत्तात्रय रघुनाथ मानवतकर यांचा असल्याचे समजले. तात्काळ दत्तात्रय मानवतकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपचारासाठी साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे . पोलीस निगराणीखाली दत्तात्रय मानवतकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. साखरखेर्डा पोलिसांनी दत्तात्रय मानवतकरसह तीन व्यक्तींविरोधात विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत .

Web Title: Desecration of a religious place at Shendurjan