वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:35 IST2021-07-31T04:35:12+5:302021-07-31T04:35:12+5:30

यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नपा. निवडणूक व सामाजिक व राजकीय विषयावर मार्गदर्शन करून पक्षाचा विचार समाजातील शेवटच्या ...

Deprived Bahujan Alliance Review Meeting | वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक

वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक

यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नपा. निवडणूक व सामाजिक व राजकीय विषयावर मार्गदर्शन करून पक्षाचा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. तसेच राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांनी संघटनात्मक बांधणी, कार्यकर्ता कसा असावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच राज्याच्या महासचिव डॉ. अरुधंती शिरसाट, राज्य महिला उपाध्यक्षा सविताताई मुंडे, राज्य विद्वतसभेचे राज्य समन्वयक डॉ.मनोज निकाळजे यांनी मार्गदशन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष भीमराव शिरसाठ, मिलिंद वानखेडे, शेषराव मोरे, बाला राऊत, महेश देशमुख, समाधान जाधव, रमेश आंबेकर, पृथ्वीराज तायडे, दत्ता राठोड, विनायक मापारी, शेषराव बोदडे, आबाराव वाघ, राहुल झोटे, श्रीकांत जाधव, संजय धुरंधर, युवराज भिडे, उद्धव वाकोडे, दिलीप राठोड, मधुकर शिंदे, मोबीनभाई यांच्यासह तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे संचलन अ‍ॅड. अमर इंगळे व आभार प्रदर्शन विष्णू उबाळे व प्रशांत वाघोदे यांनी केले.

Web Title: Deprived Bahujan Alliance Review Meeting