शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

गुलाबी बोंडअळी रोखण्यात कृषी विभाग तोंडघशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 11:54 AM

Khamgaon Agriculture News कृषी विभागाच्या प्रतिबंधात्त्मक उपाययोजना अपयशी झाल्याचे आता पुढे येत आहे.

- सदानंद सिरसाट

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात गेल्या वर्षी अखेरच्या टप्प्यातील कापसाच्या बोंडात बोंडअळीचे प्रमाण ६७ टक्क्यांपेक्षाही अधिक आढळून आल्याने त्यावर उपाययाेजना करण्यासाठी कृषी आयुक्तांनी १५ मे २०२० रोजीच्या पत्रातून सर्वसंबंधितांना बजावल्यानंतरही कापूस उत्पादक पट्ट्यात बोंडअळीचे प्रमाण चालू हंगामात प्रचंड वाढत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या प्रतिबंधात्त्मक उपाययोजना अपयशी झाल्याचे आता पुढे येत आहे.फेब्रुवारी २०२० या महिन्यात कृषी विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शेतातील पिकाच्या हिरव्या बोंडात बोेंडअळीचे प्रमाण धक्कादायक होते. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात  कापसाच्या बोंडाचे निरिक्षण करण्यात आले. त्यामध्ये पाचही जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के बोंडामध्येगुलाबी बोंडअळी आढळून आली होती. त्यानंतर ती कापूस आणि पिकाच्या शेतातील अवशेषामध्ये सुप्तावस्थेत होती. पहिला पाऊस आल्यानंतर ती कोशातून बाहेर पडणार असल्याचेही निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यामुळेच कापसाचे बीयाणे मे महिन्याच्या अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बाजारात आणण्याचीही करण्याची शिफारस विद्यापिठाने केली होती. गेल्या वर्षी कापसाचा हंगाम फेब्रुवारी अखेरपर्यंतही सुरूच होता. त्यामुळे यावर्षी बीटी कापसाची पूर्वहंगामी लागवड झाल्यास बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली होती. या संकटाचा सामना करण्याची तयारीही राज्यस्तरावरूच एप्रिलपासून करण्यात आली. त्यामध्ये अनेक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानेच आता बोंडअळीचे संकट वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तसेच उत्पादन घटण्याची शक्यता आहे. 

या होत्या उपाययोजना

  •  पूर्वहंगामी लागवड रोखणे, 15 जूननंतरच पेरणी करणे, शेतातील कापसाचे पीक काढून
  •  त्याची विल्हेवाट लावणे, किडीचे अवशेष शेतात राहणार नाहीत, कोणताही ढिग शेतात
  •  न ठेवणे, कापसाचे मार्केट यार्ड स्वच्छ करणे, जिनिंगमधील कापसावर प्रक्रीया करून स्वच्छ करणे, तेथे कामगंध सापळे लावणे, 5 टक्के निंबोळी अर्क फवारणी करणे. 
टॅग्स :agricultureशेतीkhamgaonखामगाव