अनुदानावर मंजूर झालेल्या विहिरी खोदण्यास शेतकºयांचा नकार
By Admin | Updated: April 12, 2017 13:39 IST2017-04-12T13:39:24+5:302017-04-12T13:39:24+5:30
शासनाच्या धडक सिंचन योजनेतून शेतकºयांना शेतात विहिर खोदण्यासाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येते.

अनुदानावर मंजूर झालेल्या विहिरी खोदण्यास शेतकºयांचा नकार
नांदुरा : नापिकीमुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या पाहता शेतकरी समृध्द व्हावा यासाठी सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी शासनाच्या धडक सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना शेतात विहिर खोदण्यासाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येते. या अंतर्गत नांदुरा तालुक्यातील १२५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र यापैकी आधी काम व नंतर अनुदान तसेच मिळणारे अनुदान तोकडे असणे, जलपातळी खालावल्याने खर्च जास्त असणे या व इतर कारणामुळे १२५ पैकी ४८ शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेत विहिर खोदण्यास नकार दिला आहे. एकूणच निर्माण होणाऱ्या अडचणी पाहता या योजनेचे अनुदान वाढवावे इतर अडचणी दूर कराव्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.