साठेगाव येथे डेंग्यू सदृष्य रुग्ण आढळला

By Admin | Updated: September 3, 2014 00:23 IST2014-09-03T00:21:35+5:302014-09-03T00:23:43+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव येथे साथीच्या आजाराचे थैमान.

Dengue was found in Satgaon | साठेगाव येथे डेंग्यू सदृष्य रुग्ण आढळला

साठेगाव येथे डेंग्यू सदृष्य रुग्ण आढळला

सिंदखेडराजा : तालुक्यातील साठेगाव येथे साथीच्या आजारासह मलेरियाच्या तापेने थैमान घातले असून, एका १५ वर्षीय मुलाला डेंग्यू सदृष्य तापेची लागण झाल्याचेही आढळून आले. अभिमन्यू मुरलीधर नागरे (१५) या मुलाचा ताप वाढला असून, त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अभिमन्यू नागरेला डेंग्यूची ताप असल्याचे निदान झाले आहे. गावात असलेली अस्वच्छता व अशुद्ध पिण्याचे पाणी यामुळे सदर आजार उद्भवत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी दामोधर नागरे, शिवहरी नागरे, ज्ञानेश्‍वर नागरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Dengue was found in Satgaon