२० हजार रुपयांची मागणी : कृषी सहायक 'एसीबी'च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:54 AM2020-07-25T11:54:10+5:302020-07-25T11:54:23+5:30

२० हजार रुपयांची मागणी करणारा कृषि सहाय्यक शुक्रवारी बुलडाणा लाचलूपचत विभागाच्या जाळ्यात अडकला.

Demand for Rs 20,000: agricultural assistant trapped by 'ACB' | २० हजार रुपयांची मागणी : कृषी सहायक 'एसीबी'च्या जाळ्यात

२० हजार रुपयांची मागणी : कृषी सहायक 'एसीबी'च्या जाळ्यात

googlenewsNext

जळगाव जामोद : शेततळ्याच्या अनुदानाचे बिल काढण्यासाठी होती २० हजार रुपयांची मागणी करणारा कृषि सहाय्यक शुक्रवारी बुलडाणा लाचलूपचत विभागाच्या जाळ्यात अडकला.
तालुका कृषी विभाग कार्यालयाच्या अंतर्गत काजेगाव येथे कार्यरत असलेले कृषी सहाय्यक संजाबराव तारूबा गवई (वय ४२ वर्ष) याने शेततळ्याचे अनुदान काढून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्याकडे २० जुलै रोजी दिलेल्या तक्रारीनुसार २४ जुलै रोजी बुलडाणा जिल्हा पथकाने धाड टाकून पहिला हप्ता दहा हजार रुपयाची मागणी करणाऱ्या कृषी सहाय्यकाला ताब्यात घेतले.
तक्रारदार याने कृषी योजनेच्या माध्यमातून शेतात केलेल्या शेततळ्याचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात कृषी सहाय्यकाने वीस हजार रुपए लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलडाणा येथील पथकाने लोकसेवक पदाचा गैरवापर करून स्वत:साठी पैशाचे स्वरूपातील आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न केला व लोकसेवक पदाला न शोभणारे गैरवर्तन केल्याने त्यांच्याविरुद्ध कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा संशोधन २०१८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे
या पथकामध्ये सापळा अधिकारी अर्चना जाधव यांच्यासह रवींद्र दळवी, पोका विनोद लोखंडे, अझरुद्दीन काजी, व चालक शेख अर्शद त्यांचा समावेश होता.

Web Title: Demand for Rs 20,000: agricultural assistant trapped by 'ACB'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.