शेतकरीविराेधी कायदे रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:32 IST2021-02-07T04:32:14+5:302021-02-07T04:32:14+5:30

अमडापूर : चिखली तालुक्यातील उंद्री येथे ५ फेब्रुवारी रोजी खामगाव-जालना महामार्गावरील बसथांबा चौफुलीवर दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील शहीद ...

Demand for repeal of anti-farmer laws | शेतकरीविराेधी कायदे रद्द करण्याची मागणी

शेतकरीविराेधी कायदे रद्द करण्याची मागणी

अमडापूर : चिखली तालुक्यातील उंद्री येथे ५ फेब्रुवारी रोजी खामगाव-जालना महामार्गावरील बसथांबा चौफुलीवर दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील शहीद झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी शेतकरीविराेधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राम डहाके यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असे प्रतिपादन यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष समाधान सुपेकर यांनी केले. या प्रसंगी बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान सुपेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन मापारी,मा. तंटामुक्ती अध्यक्ष फकिराशेठ, मा. उपसरपंच हरूनभाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आकाश राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांतजी झिने, युवक काँग्रेसचे रवी ऊर्फ बंडू तरळकर, गोपाल उगवेकर, वसंतराव बारगळ, प्रमोदजी टेकाळे, गोपाल शिंदे, राम कोकाटे, आशीष राऊत, इलियास भाई, गोविंदा जगताप, सय्यद सौराब, गब्बरभाई, विष्णूभाऊ बोन्द्रे, मनोहर दिवटे, गणेश पारखेडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी बांधव, गावकरी व युवक उपस्थित होते.

Web Title: Demand for repeal of anti-farmer laws