किनगाव जट्टू येथे प्रवासी निवारा उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST2021-06-21T04:22:52+5:302021-06-21T04:22:52+5:30

किनगाव जट्टू बस स्थानकावर काही वर्षांपूर्वी प्रवासी निवारा उभारण्यात आला हाेता़ मात्र, लोणार ते नगर माळ, दुसरबीड या ...

Demand for construction of passenger shelter at Kingaon Jattu | किनगाव जट्टू येथे प्रवासी निवारा उभारण्याची मागणी

किनगाव जट्टू येथे प्रवासी निवारा उभारण्याची मागणी

किनगाव जट्टू बस स्थानकावर काही वर्षांपूर्वी प्रवासी निवारा उभारण्यात आला हाेता़ मात्र, लोणार ते नगर माळ, दुसरबीड या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करताना येथील प्रवासी निवारा उद्ध्वस्त करण्यात आला हाेता़ या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून किनगाव जट्टूच्या समोर दोन किलोमीटर अंतरावर देवा नगर फाट्यावर व पाठीमागे तीन किलोमीटर अंतरावर जवळका फाट्यावर प्रवासी निवारे उभारण्यात आले आहे़ मध्येच किनगाव जट्टू बस स्थानकावर प्रवासी निवारा उभारण्यात आला नसल्याचे चित्र आहे़ परिसरातील आठ ते दहा खेड्यांतील नागरिकांना कोठेही जायचे असल्यास किनगाव जट्टूपासून प्रवास करावा लागताे़ त्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. प्रवाशांची गर्दी असते़ उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागताे़ अनेक वेळा बस येण्यास विलंब हाेताे़ त्यामुळे, प्रवाशांना पावसाळ्यात भिजत बसची प्रतीक्षा करावी लागते़ याकडे संबंधितांनी लक्ष देऊन तातडीने प्रवासी निवारा उभारण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे़

Web Title: Demand for construction of passenger shelter at Kingaon Jattu