डोणगावात मतदान बुथ केंद्र वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 17:48 IST2018-07-18T17:47:05+5:302018-07-18T17:48:04+5:30
डोणगाव : येथे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मतदरांची गैरसोय होवू नये, म्हणून मतदान बुथ केंद्र वाढविण्याची मागणी अल्पसंख्यांक काँग्रेसचे कार्यकर्ते अबरारखान मिल्ली आदींनी केली आहे.

डोणगावात मतदान बुथ केंद्र वाढविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : येथे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मतदरांची गैरसोय होवू नये, म्हणून मतदान बुथ केंद्र वाढविण्याची मागणी अल्पसंख्यांक काँग्रेसचे कार्यकर्ते अबरारखान मिल्ली आदींनी केली आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव हे ३५ हजार लोकसंख्येचे गाव असून या गावात मतदान बुथ केंद्र कमी असल्याने प्रत्येक बुथवर नागरिकांची गर्दी होते. नवीन लोकसंख्येचा आढावा घेतल्यास व मतदार बांधवांचा विचार केल्यास पुर्वीचे मतदान बुथ केंद्र कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. एका मतदान बुथवर ८०० पेक्षा अधिक मतदार असून एका बुथवर ५०० पेक्षा अधिक मतदार नसावेत, अशी मागणी आहे. आगामी निवडणुकाच्या दृष्टीने मतदारांची गैरसोय होवू नये म्हणून डोणगाव येथे मतदान बुथ केंद्रे वाढवावीत, अशी मागणी अल्पसंख्यांक काँग्रेसचे कार्यकर्ते अबरारखान मिल्ली व जावेदखॉ हकीमखॉ पठाण यांनी १६ जुलै रोजी तहसिलदारांकडे केली. यावेळी निवेदन देताना अबरार खान, जावेद पठाण, हमीद मुल्लाजी, राजू आसिक शेख, उटीचे सरपंच संजय सुळकर उपस्थित होते.