शेतकरी हिताचे निर्णय घ्या- शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:42 IST2021-09-10T04:42:09+5:302021-09-10T04:42:09+5:30

डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच संबंधित पदाधिकारी व प्रशासक यांना सूचना दिल्या. यावेळी डॉ. राजेंद्र ...

Decide in the interest of the farmers | शेतकरी हिताचे निर्णय घ्या- शिंगणे

शेतकरी हिताचे निर्णय घ्या- शिंगणे

डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच संबंधित पदाधिकारी व प्रशासक यांना सूचना दिल्या. यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बाजार समिती यार्डमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून कोल्ड स्टोरेज याचबरोबर व्यापाऱ्यांसाठी बांधलेले दुकाने व गोडाऊन यांची पाहणी केली. या सर्व प्रश्नांवर डॉ. शिंगणे यांनी संबंधित विभागाला दिलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत आदेश दिले आहेत. मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या बिलासंबंधित जो काही प्रश्न असेल याबाबत कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ऊर्जामंत्री यांच्याशी चर्चा करून वीज बिलाबाबत असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. तर याचबरोबर अतिवृष्टी खरडून गेलेली पिके जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याबाबत संबंधित विभागाला योग्य त्या सूचना करून शेतकऱ्यांना योग्य तो लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

Web Title: Decide in the interest of the farmers