नवीन व्यवसायासाठी कर्ज देण्यात उदासिनता!

By Admin | Updated: December 6, 2015 02:33 IST2015-12-06T02:33:05+5:302015-12-06T02:33:05+5:30

मुद्रा योजनेत जुन्या खातेदारांना नव्याने कर्ज.

Debt to pay for a new business! | नवीन व्यवसायासाठी कर्ज देण्यात उदासिनता!

नवीन व्यवसायासाठी कर्ज देण्यात उदासिनता!

किशोर खैरे / नांदुरा (जि. बुलडाणा): युवकांना रोजगार उपलब्ध करून स्वयंरोजगार सुरू करावा यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. मात्र या योजनेअंतर्गत नवीन व्यवसायीकांना कर्ज देण्यास उदासीनता दिसत असून नांदुरा शहरातील बँकांनी जुन्याच कर्जदारांना किंवा ज्यांचे अगोदर व्यवसाय आहेत अशांनाच कर्ज देवून शासनाकडून आलेले उदष्ठि पूर्ण करणे सुरू आहे. बँक ऑफ इंडियाच्या नांदुरा शाखेने उदासीनतेचा कळसच गाठला असून मुद्रा योजनेत स्वतंत्र व्यवसायासाठी ५ ते १0 लाख रूपयांपर्यंंत कर्ज देण्याची तरतूद असताना बँक ऑफ इंडियाने २0 हजार रुपयापासून ५0 हजारापर्यंंत ४0 कर्ज प्रकरणे मंजूर केलीत तर दोन लाख रूपये कर्ज मागणारी प्रकरणे पेंडींग आहेत. अशा प्रकारचे १0 ते १२ लाख रूपये मुद्रा योजनेत व्यवसायीकांना देण्यात आलीत. परंतु २0 हजार रूपयात चांगला व्यवसाय उभा राहत नसून कर्जदार ती रक्कम घरगुती कामात वापरतात असा अनुभव आहे. मात्र अशीच कर्ज प्रकरणे मंजुर केल्या गेतील. यात २0 नवीन तर २५ जुन्याच व्यवसाईकांना कर्ज देण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ४५ कर्ज प्रकरणे मंजुर केली होती. त्यात २९ लाख रूपये व्यवसायीकांना वाटले . नांदुरा शहरात सध्या तरी स्टेट बँकेने सर्वात जास्त रक्कम मुद्रा योजनेत वाटली असून यातही एकही नवीन व्यवसाय करणारा कर्जदार नाही. सर्वच प्रकरणे ५0 हजार रूपयांच्यावर मंजुर केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रला ४0 केसेस मंजुर करण्याचे टारगेट मिळाले असून ते पुर्णत्वाकडे आहे. दोन लाख रूपयाच्या वरील कर्ज प्रकरणे तपासणीकरीता पेंडींग असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापाने सांगितले.

Web Title: Debt to pay for a new business!