बुलडाण्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:31 IST2017-10-30T00:29:12+5:302017-10-30T00:31:15+5:30

पातुर्डा (बुलडाणा) : सततची नापिकी व डोक्यावरील कर्जाला  कंटाळून एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना २९ ऑक्टोबर रोजी घडली. सकाळी उघडकीस आली.  

Debt Farmer Suicide in Buldhana | बुलडाण्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

बुलडाण्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

ठळक मुद्देबुलडाणा जिल्हय़ातील पातुर्डा येथील घटनामृत शेतकरी : रामदास नामदेव तायडे

लोकमत न्यूज नेटवर्क
पातुर्डा (बुलडाणा) : सततची नापिकी व डोक्यावरील कर्जाला  कंटाळून एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना २९ ऑक्टोबर रोजी घडली. सकाळी उघडकीस आली.  रामदास नामदेव तायडे (वय ६५) असे आत्महत्या केलेल्या  शेतकर्‍याचे नाव आहे. तायडे यांच्याकडे अडीच एकर शेती हो ती. त्यांच्याकडे त्यांच्याकडे बुलडाणा जिल्हा बँकेचे ४७ हजार  रुपयाचे कर्ज थकीत होते. यावर्षी सोयाबीनची पेरणी केली, परंतु  पीक हातचे गेले होते. यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी  रविवारी सकाळी आत्महत्या केली. 

Web Title: Debt Farmer Suicide in Buldhana

टॅग्स :Farmerशेतकरी