शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

खदानीत बुडून दोन युवकांचा मृत्यू, बर्डे प्लॉट व फाटकपुरा भागात शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 9:25 PM

खामगाव :  शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या माथनी येथील खदानमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून करुण अंत झाला. ही घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. खामगाव शहरातील मस्तान चौक परिसरातील रहिवाशी शेख सिकंदर शेख कादर (वय १९) व बर्डे प्लाटमधील रहिवाशी शेख जुबेर शेख महबूब (वय २०) हे दोघे आपल्या मित्रासोबत आज दुपारी ४ ...

खामगाव :  शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या माथनी येथील खदानमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून करुण अंत झाला. ही घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. 

खामगाव शहरातील मस्तान चौक परिसरातील रहिवाशी शेख सिकंदर शेख कादर (वय १९) व बर्डे प्लाटमधील रहिवाशी शेख जुबेर शेख महबूब (वय २०) हे दोघे आपल्या मित्रासोबत आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास माथनी येथील खदानमध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले. त्यांना पोहता येत नसल्यानंतरही मित्रांच्या आग्रहास्तव त्यांनी उडी टाकली. मात्र पाणी जास्त असल्याने ते खदानीतील कपारीत बुडाले. त्याठिकाणी उपस्थित सैयद इस्माइल, सैयद सही यांनी नागरिकांच्या आणि गावकऱ्यांच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.  तातडीने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी दोघानांही डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, माजी  नगरसेवक मो.नईम, अन्सार भाई, बबलु पठान, हाफीज साहेब यांच्यासह मुस्लीम समाज बांधव व नागरीक उपस्थित होते. या घटनेचे वृत्त पसरताच सामान्य रुग्णालयात नागरीकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील, शहर पो.स्टे. चे ठाणेदार संतोष टाले हे देखील सामान्य रुग्णालयात दाखल झाले. यावेळी रुग्णालयात परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. मुस्लीम समाजातील दोन तरुणांचा या घटनेत दुदेर्वी मृत्यू झाल्याने बर्डे प्लॉट व फाटकपुरा भागात शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

लोकप्रतिनिधींची रुग्णालयात धाव 

या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सामान्य रुग्णालयात धाव घेतली. घटनेची माहिती घेत मृतकाच्या कुटुंबियांचे सात्वंन केले. याशिवाय आमदार आकाश फुंडकर यांनी दुख:द संवेदना व्यक्त केल्यात. भाजप मिडिया सेलचे सदस्य सागर फुंडकर यांनी सामान्य रुग्णालयात  शवविच्छेदन विभागात जाऊन नातलगांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdrowningपाण्यात बुडणे