शेतीच्या वादातून मारहाण, जिवे मारण्याची धमकी
By सदानंद सिरसाट | Updated: December 5, 2023 17:35 IST2023-12-05T17:34:46+5:302023-12-05T17:35:27+5:30
तक्रारीवरून बाप-लेकांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

शेतीच्या वादातून मारहाण, जिवे मारण्याची धमकी
खामगाव (बुलढाणा) : नातेवाइकांमध्ये असलेल्या शेतीच्या जुन्या वादातून एकाला फावड्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथे सोमवारी सायंकाळी ५:४५ वाजता येथे घडली. याप्रकरणी तक्रारीवरून बाप-लेकांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी संतोष भीमराव मुंढे (३६) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळेजवळ उभा असताना नातेवाईक असलेल्या रवी सुरेश मुंडे (२८) याने शिवीगाळ केली, तसेच फावड्याने डोक्यावर वार केला. त्यावेळी हटकले असता सुरेश भीमराव मुंडे (६०), अजय सुरेश मुंडे (२६) या दोघांनीही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले. सोबतच नादी लागला तर जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून पोलिसांनी तिन्ही बाप-लेकांविरुद्ध भादंविच्या ३२४, ३२३, ५०४,५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पुढील तपास पोहेकॉ विनोद शेळके करीत आहेत.