छतावरुन पडल्याने गरोदर महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: May 16, 2017 01:34 IST2017-05-16T01:34:26+5:302017-05-16T01:34:26+5:30

खामगाव (जि. बुलडाणा) : छतावरुन पडून डोक्याला मार लागल्याने प्रकृती अत्यवस्थ झालेल्या गरोदर महिलेचा १५ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Death of pregnant woman due to falling from the roof | छतावरुन पडल्याने गरोदर महिलेचा मृत्यू

छतावरुन पडल्याने गरोदर महिलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव (जि. बुलडाणा) : छतावरुन पडून डोक्याला मार लागल्याने प्रकृती अत्यवस्थ झालेल्या गरोदर महिलेचा १५ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १४ मे रोजी घडली होती. स्थानिक गजानन कॉलनी भागात राहणारे प्रकाश वाकोडे यांची विवाहित मुलगी आरती विजयानंद थोरात (वय २५) ही माहेरी आली होती.
दरम्यान, १४ मे रोजी ती मोबाइलवर बोलत असताना छतावरुन पडल्याने गंभीर जखमी झाले. यामुळे तिला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान १५ मे रोजी तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शहर पोलिसांनी कलम १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Death of pregnant woman due to falling from the roof