जेसीबीच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:01 IST2020-02-10T16:01:22+5:302020-02-10T16:01:26+5:30
जेसीबीच्या पंजाची धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

जेसीबीच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू
खामगाव : जेसीबीच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना वाडी भागातील टेक्नीकल शाळेसमोर मुलींच्या नवीन वस्तीगृहाचे बांधकामाच्याठिकाणी घडली ८ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजता हा अपघात घडला.
वस्तीगृहाच्या गेटजवळ जेसीबी (क्रमांक एम-एच-२८-ए-झेड-०४२८) ने खोदकाम सुरु होते. या दरम्यान त्याठिकाणी असलेले मिलिंद गौतम गव्हांदे (३०, रा.उमरा भिसे) यांना जेसीबीच्या पंजाची धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री १२.३० वाजताच्या सुमारास जेसीबी चालक मालक संतोष विठ्ठल चव्हाण (रा.वाडी) यांच्या निदर्शनास आली. मृतक मिलिंद गव्हांदे हे वाडी येथील विनोद बुध्दप्रकाश चोटमल यांच्या घरी आले होते.