वाडी शिवारात मोरांचा मृत्यू, वन विभागाकडून पंचनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:34 IST2018-03-13T01:34:21+5:302018-03-13T01:34:21+5:30

खामगाव(जि. बुलडाणा):  येथून जवळच असलेल्या ग्राम वाडी शिवारात मोरांचा शनिवारी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. वन विभागाने पंचनामा केला आहे.

Death of peacock in Wadi Shivar, Panchancha by forest department | वाडी शिवारात मोरांचा मृत्यू, वन विभागाकडून पंचनामा 

वाडी शिवारात मोरांचा मृत्यू, वन विभागाकडून पंचनामा 

ठळक मुद्देमोराच्या मृतदेहाचा पंचनामा

खामगाव(जि. बुलडाणा):  येथून जवळच असलेल्या ग्राम वाडी शिवारात मोरांचा शनिवारी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. वन विभागाने पंचनामा केला आहे. 
शहरालगत असलेल्या वाडी शिवारात मोरे संकुलजवळ मोठ्या प्रमाणात मोरपिसे नागरिकांना आढळून आली. परिसरातील नागरिकांनी इतरत्र पाहणी केली असता त्यांना मोराचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ वन विभागाकडे याबाबत माहिती दिली. वन अधिकाºयांनी पंचनामा करून एका मोराचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला; परंतु मोराचा मृत्यू कशामुळे झाला, याचा शोध वन विभाग घेत आहे. वन विभागाने केवळ एकाच मोराच्या मृतदेहाचा पंचनामा केला असून, परिसरातील नागरिकांनी किमान दोन ते तीन मोर मृत्युमुखी पडले होते, असे सांगितले. त्यामुळे मोरांची शिकार झाली की आकस्मिक मृत्यू, याबाबत शंका-कुशंका व्यक्त होत आहे. वन विभागाचे अधिकारी तुळशिराम साळुंके यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी वन्यजीव विभागाने पंचनामा केला आहे. त्याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले.  
 

 

 

Web Title: Death of peacock in Wadi Shivar, Panchancha by forest department