ट्रॅक्टर अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST2021-03-22T04:31:27+5:302021-03-22T04:31:27+5:30
विष्णू ज्ञानबा शिंदे (४०) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाडळी शिंदे येथे १९ मार्च रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट ...

ट्रॅक्टर अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
विष्णू ज्ञानबा शिंदे (४०) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाडळी शिंदे येथे १९ मार्च रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. या पावसादरम्यान शेतातून घराकडे येत असताना शेतरस्ता दलदलीचा झाला होता. त्यातच विष्णू ज्ञानबा हे ज्या ट्रॅक्टरने येत होते ते नाल्यात कोसळले होते. या ट्रॅक्टरखाली ते व त्यांचा एक सहकारी दबल्या गेल्यामुळे ते जखमी झाले होते. दरम्यान, ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन दोघांनाही बाहेर काढले होते. यातील एक जण किरकोळ जखमी होता तर विष्णू शिंदे गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी देऊळगाव मही येथे हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना जालना येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान १९ मार्च रोजीच रात्री त्यांचे निधन झाले. २० मार्च रोजी त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्त परिवार आहे.