पाण्याच्या टाकीत पडून चिमुकलीचा मृत्यू
By Admin | Updated: January 28, 2016 23:34 IST2016-01-28T23:23:01+5:302016-01-28T23:34:50+5:30
साखरखेर्डा येथील घटना.

पाण्याच्या टाकीत पडून चिमुकलीचा मृत्यू
साखरखेर्डा (जि. बुलडाणा) : स्थानिक शिक्षक कॉलनीत एका दहा वर्षीय चिमुकलीचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी घडली. नारायण बुरकूल यांची मुलगी निशा बुरकूल (१0) ही ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतली. मुलांसोबत खेळत असताना पाण्याच्या टाक्यात निशा पडली. घटनास्थळावर महिलांनी धाव घेतली. एका शिक्षकाने टाक्यात उतरुन मुलीला बाहेर काढले. रुग्णालयात दाखल केले.; परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.