भावंडाचा अपघातात मृत्यू

By Admin | Updated: December 11, 2015 02:34 IST2015-12-11T02:34:26+5:302015-12-11T02:34:26+5:30

अल्पवयीन भावंडाचा डोणगाव ते मालेगाव रोडवरील अपघातात मृत्यू.

Death in a car crash | भावंडाचा अपघातात मृत्यू

भावंडाचा अपघातात मृत्यू

गोहोगाव दांदडे (जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील गोहोगाव दांदडे येथील अल्पवयीन भावंडाचा डोणगाव ते मालेगाव रोडवरील अकोला बायपासवर मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना ९ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली. गोहोगाव दांदडे येथील किशोर कानकटाव यांचे सचिन कानकटाव (१५) व नितीन कानकटाव (१३) हे दोन मुले मालेगाव तालुक्यातील राजाकिन्ही येथील वसतिगृहात शिक्षण घेत होते. दरम्यान, ते दोघे भाऊ गजानन बावीस्कर यांच्या मोटारसायकलने बुधवारला सायंकाळच्या सुमारास राजाकिन्हीवरून डोंगरकिन्हीला आपल्या बहिणीकडे येत असताना अकोला बायपासवर त्यांच्या मोटारसायकलला समोरून येणार्‍या मोटारसायकलने जबर धडक दिली. त्यामध्ये सचिन किशोर कानकटाव हा जागेवरच ठार झाला. तर नितीन किशोर कानकटाव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोटारसायकल चालक गजानन बाविस्कर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.

Web Title: Death in a car crash