आंत्रविषारच्या रोगाने ६0 बक-यांचा मृत्यू

By Admin | Updated: June 22, 2015 02:15 IST2015-06-22T02:15:20+5:302015-06-22T02:15:20+5:30

मातोळा तालुक्यातील खैरखेड येथील घटना; शेकडो बक-यांना झाली लागण.

Death of 60 banks with enteric diseases | आंत्रविषारच्या रोगाने ६0 बक-यांचा मृत्यू

आंत्रविषारच्या रोगाने ६0 बक-यांचा मृत्यू

मोताळा (जि. बुलडाणा): आंत्रविषार या रोगाची लागण झाल्याने तालुक्यातील खैरखेड येथे तब्बल ६0 बकर्‍यांचा मृत्यू झाला, तर शेकडो बकर्‍यांना रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सोमवार, १५ जूनपासून खैरखेड येथील बकर्‍यांना आंत्रविषार या रोगाची लागण झाल्याचे पशुपालकांच्या लक्षात आले. या रोगामध्ये तोंडातून फेस येऊन बकर्‍यांचा मृत्यू होतो. सोमवारपासून या रोगाची लागण झालेल्या बकर्‍या तडकाफडकी मरत आहेत. नवीन पालवी खाल्ल्याने व दूषित पाणी पिल्याने या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी पसरटे यांनी सांगितले. बाधित बकर्‍यांना सध्या लसीकरण करण्यात येत आहे.
डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या खैरखेड गावात शेतामध्ये मजुरी करणारे बहुतांश नागरिक असून, शेतीला पर्याय म्हणून शेळीपालन हा व्यवसाय येथील नागरिकांचा आहे; मात्र शेकडो बकर्‍यांना आंत्रविषारची लागण होऊन त्यापैकी अनेक मेल्या आहेत. वृत्त लिहीपर्यंतदेखील लागण झालेल्या बकर्‍या दगावत असल्याचे सांगितले जात आहे.
मरण पावलेल्या बकर्‍यांमध्ये काही गाभण असल्याने पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत खैरखेड येथील विजयसिंह लख्खू नाईक यांच्याकडील नऊ, गंगाबाई घोती, धनसिंह नाईक, गोविंदसिंग लख्खू नाईक यांच्याकडील आठ, बसनदास पडवाळ, रामदास लक्ष्मण गवई, रमेश लक्ष्मण मोरे यांच्याकडील सात, अरविंद घोती, सजनसिंग नाईक यांच्याकडील सहा, तर वसंत पडवाळ यांच्या चार बकर्‍या मेल्याने त्यांचे जबर नुकसान झाले. गेल्या पाच दिवसांपासून बकर्‍या दगावण्याच्या घटना घडत आहे.
दरम्यान, आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी डॉ. पसरटे यांच्याशी संपर्क साधून योग्य खबरदारी घेण्याच्या व प्रतिबंधात्मक उपचार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषद सदस्य अनिल खाकरे यांनीसुद्धा गावात पाहणी केली. ऐन पेरणीच्या तोंडावर या घटनेने पशुपालकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

Web Title: Death of 60 banks with enteric diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.