दांडी बहाद्दर मुख्याधिकाऱ्यांच्या रडारवर!
By Admin | Updated: April 4, 2017 00:40 IST2017-04-04T00:40:22+5:302017-04-04T00:40:22+5:30
खामगाव मुख्याधिकाऱ्यांच्या या आकस्मिक पाहणीमुळे नगर पालिकेत खळबळ उडाली आहे.

दांडी बहाद्दर मुख्याधिकाऱ्यांच्या रडारवर!
खामगाव : पालिकेतील कार्यालयीन काामकाजात पारदर्शकतेसोबतच, दांडी बहाद्दर आणि लेटलतिफ कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी सोमवारी पालिकेच्या सर्वच विभागांची आकस्मिक पाहणी केली. मुख्याधिकाऱ्यांच्या या आकस्मिक पाहणीमुळे नगर पालिकेत खळबळ उडाली असून, यावेळी कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित असलेल्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत आहेत. पालिकेतील विविध विभागातील कर्मचारी कामकाजाच्या वेळेत दांडी मारत असल्याच्या अनेक तक्रारी मुख्याधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. याबाबत सूचना दिल्यानंतरही उपयोग न झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सोमवारी दुपारी मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी पालिकेतील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती जाणून घेण्यासाठी आकस्मिक भेट दिली.