शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीवरून परतणार्‍या क्रुझरला अपघात; ६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:38 IST

मलकापूर : चालकाच्या डुलकीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून शिर्डी येथून दर्शन घेवून मलकापुरकडे परतीच्या मार्गावर असलेल्या क्रुझरचा अपघात घडून या अपघातात ६ भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास शेलापुर जवळील भोरटेक फाटा येथे बुलडाणा रोडवर घडली.

ठळक मुद्देचालकाला डुलकी लागल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटलेपहाटे ५.४५ च्या सुमारास शेलापूर-भोरटेक फाट्याजवळ घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : चालकाच्या डुलकीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून शिर्डी येथून दर्शन घेवून मलकापुरकडे परतीच्या मार्गावर असलेल्या क्रुझरचा अपघात घडून या अपघातात ६ भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास शेलापुर जवळील भोरटेक फाटा येथे बुलडाणा रोडवर घडली.याबाबत सविस्तर असेकी, आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्याचा व्यवसाय करणारे काही व्यवसायिक ४ वाहनांनी सहपरिवार शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला गेले होते. येथून दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असलेल्या त्या ४ वाहनापैकी एका क्रुझर वाहन चालकाला भोरटेक फाट्यानजीक डुलकी लागली. अन यातच सदर क्रुझर गाडीने तब्बल चार पलट्या घेतल्या. या अपघातात क्रुझरमधील कुसूम महादेव कापसे (वय ५0), योगेश महादेव कापसे (वय ३0), नयना योगेश कापसे (वय ४) रा.बाजीप्रभु देशपांडे नगर, भगवान मोतीराम भिसे (वय ५५), निर्मला भगवान भिसे (वय ५0), रा. माता महाकालीनगर ईश्‍वर देवकर  (वय ४0), रा.शिवाजी नगर आदी सहा भाविक गंभीर जखमी झालेत. तर वाहन चालक राष्ट्रपाल खराटे (वय ३२) रा. लोणवडी हा किरकोळ जखमी झाला.दरम्यान पाठीमागुन येत असलेल्या सहकारी वाहनातील भाविकांनी या जखमींना तातडीने शहरातील डॉ.राहुल चोपडे यांचे रूग्णालयात दाखल केले. येथे जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येवून सहाही जखमींना बाजीप्रभु देशपांडे नगरातील शिवाजी गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अकोला येथील डॉ.हेमंत जोशी यांच्या खासगी रूग्णालयात पुढील उपचारार्थ भरती केले. सायंकाळी या कार्यकर्त्यांशी संपर्क केला असता   काही जखमींवर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती देण्यात आली.