शिर्डीवरून परतणार्या क्रुझरला अपघात; ६ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:38 IST2017-08-03T23:35:48+5:302017-08-03T23:38:28+5:30
मलकापूर : चालकाच्या डुलकीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून शिर्डी येथून दर्शन घेवून मलकापुरकडे परतीच्या मार्गावर असलेल्या क्रुझरचा अपघात घडून या अपघातात ६ भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास शेलापुर जवळील भोरटेक फाटा येथे बुलडाणा रोडवर घडली.

शिर्डीवरून परतणार्या क्रुझरला अपघात; ६ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : चालकाच्या डुलकीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून शिर्डी येथून दर्शन घेवून मलकापुरकडे परतीच्या मार्गावर असलेल्या क्रुझरचा अपघात घडून या अपघातात ६ भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास शेलापुर जवळील भोरटेक फाटा येथे बुलडाणा रोडवर घडली.
याबाबत सविस्तर असेकी, आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्याचा व्यवसाय करणारे काही व्यवसायिक ४ वाहनांनी सहपरिवार शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला गेले होते. येथून दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असलेल्या त्या ४ वाहनापैकी एका क्रुझर वाहन चालकाला भोरटेक फाट्यानजीक डुलकी लागली. अन यातच सदर क्रुझर गाडीने तब्बल चार पलट्या घेतल्या. या अपघातात क्रुझरमधील कुसूम महादेव कापसे (वय ५0), योगेश महादेव कापसे (वय ३0), नयना योगेश कापसे (वय ४) रा.बाजीप्रभु देशपांडे नगर, भगवान मोतीराम भिसे (वय ५५), निर्मला भगवान भिसे (वय ५0), रा. माता महाकालीनगर ईश्वर देवकर (वय ४0), रा.शिवाजी नगर आदी सहा भाविक गंभीर जखमी झालेत. तर वाहन चालक राष्ट्रपाल खराटे (वय ३२) रा. लोणवडी हा किरकोळ जखमी झाला.
दरम्यान पाठीमागुन येत असलेल्या सहकारी वाहनातील भाविकांनी या जखमींना तातडीने शहरातील डॉ.राहुल चोपडे यांचे रूग्णालयात दाखल केले. येथे जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येवून सहाही जखमींना बाजीप्रभु देशपांडे नगरातील शिवाजी गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अकोला येथील डॉ.हेमंत जोशी यांच्या खासगी रूग्णालयात पुढील उपचारार्थ भरती केले. सायंकाळी या कार्यकर्त्यांशी संपर्क केला असता काही जखमींवर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती देण्यात आली.