लोणार सरोवर पाहण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 02:05 IST2020-06-14T02:04:49+5:302020-06-14T02:05:02+5:30

सरोवराच्या पाण्याचा रंग गत काही दिवसांपासून लालसर गुलाबी झाल्यानं आश्चर्य व्यक्त

Crowds to see Lonar Lake | लोणार सरोवर पाहण्यासाठी गर्दी

लोणार सरोवर पाहण्यासाठी गर्दी

- किशोर मापारी 

लोणार (बुलडाणा) : खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवराचा रंग बदलल्यामुळे आणि कोरोना संसर्गानंतर अनलॉकच्या दिशेने पावले पडत असल्याने लोणार सरोवराचे हे बदललेले स्वरुप पाहण्यासाठी पर्यटक सरोवर काठावर गर्दी करत आहेत. सरोवराच्या पाण्याचा रंग गत काही दिवसांपासून लालसर गुलाबी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातून पर्यटक येथे येत आहेत. सरोवराच्या काठावर जाऊन पर्यटक सेल्फी काढण्यात मग्न आहेत; मात्र सुरक्षित शारीरिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. नीरीचे एक पथकही येथे पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. वन्य जीवचे विभागीय वन अधिकारी यांनीही येथे शनिवारी भेट दिली.

Web Title: Crowds to see Lonar Lake

टॅग्स :Lonarलोणार