शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिकविम्याची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 18:37 IST

Crop insurance : पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना सन २०२० चा पिक विमा वितरीत करणार नाही अशी भूमिका पीक विमा कंपनीने घेतली होती.

जळगाव जामोद :   सन २०२० च्या पीक विम्याची रक्कम येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे अभिवचन पिक विमा कंपनीने मंगळवारी झालेल्या बैठकीत कृषिमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या चर्चेदरम्यान दिले.       पीक विमा कंपनी याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचे शासन व लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात आले होते.यापूर्वी एक सप्टेंबर रोजी कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाली होती.परंतु त्यावेळी तोडगा निघाला नव्हता.जोपर्यंत राज्यशासन त्यांच्याकडे असलेली पीक विम्याची थकीत रक्कम जमा करीत नाही.तोपर्यंत पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना सन २०२० चा पिक विमा वितरीत करणार नाही अशी भूमिका पीक विमा कंपनीने घेतली होती.त्यावेळी आमदार डॉ.संजय कुटे यांनी जर १५ सप्टेंबर पर्यंत पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात सन २०२० ची पीक विम्याची रक्कम जमा केली नाही तर १६ सप्टेंबरपासून पिक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले जाईल असे जाहीर केले होते.      दरम्यान १६ सप्टेंबरला आ.डॉ.संजय कुटे यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले असता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांची मुदत वाढवून मागितली होती.त्यानुसार मंगळवार दि.५ ऑक्टोबर रोजी कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व जिल्ह्यातील आमदार यांच्या उपस्थितीत पिक विमा प्रतिनिधींची बैठक झाली. त्यामध्ये पिक विमा कंपनीने आपली नकारघंटा कायमच ठेवल्याने पुन्हा पेच निर्माण झाला होता.

संजय कुटे झाले आक्रमक जोपर्यंत पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचा सन २०२० चा पिक विमा त्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा करीत नाही तोपर्यंत त्यांना या बैठकीतून जाऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका आ.डॉ. संजय कुटे यांनी मंगळवारच्या बैठकीत घेतली. त्याला कृषीमंत्री ना.दादाजी भुसे व खा.प्रतापराव जाधव यांनीही पाठिंबा दिला.परिणामी पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी वरिष्ठांशी चर्चा करून येत्या आठ दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल हे मान्य केले.त्यामुळे सात-आठ महिन्यांपासून प्रलंबित असणारा हा प्रश्न अखेर मिटला. 

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाJalgaon Jamodजळगाव जामोदFarmerशेतकरी