शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Crime: अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी दोघे गजाआड

By सदानंद सिरसाट | Updated: October 8, 2022 14:58 IST

Crime News: दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यानंतर त्या तब्बल दिड महिन्याने परतल्या. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्याने मलकापूर पोलिसांनी दोघांना गजाआड केले.

सदानंद सिरसाट -  बुलढाणा - दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यानंतर त्या तब्बल दिड महिन्याने परतल्या. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्याने मलकापूर पोलिसांनी दोघांना गजाआड केले. त्यांच्या विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपींना १० आँक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला.

राष्ट्रीय महामार्गावरील एका गावानजिक तांड्यात राहत असलेली अल्पवयीन मुलगी १३ आगस्ट रोजी दुपारी शौचास जाण्यासाठी निघाली, ती परतलीच नाही. कुटुंबियांनी रात्री शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. त्या अल्पवयीन मुलीचा तपास लागला नाही. तपासात त्याच परिसरातील आणखी एक अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच उघड झाले. त्यामुळे एकाच परिसरातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले.

पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संजय ठाकरे यांच्या पथकाने तपास सुरू केला. त्यावेळी दोन वेळा आरोपींनी गुंगारा दिला. त्यातच तब्बल दीड महिन्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुली ३ आक्टोंबर रोजी परिसरात परतल्या. ६ आक्टोबर रोजी त्या शहर पोलिसात हजर झाल्या. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी आरोपी श्रावण देविदास भोसले (२०), प्रमोद उर्फ रामदास विक्रम सोळुंके (२२) या बेलाड फाट्यावरील दोघांना गजाआड केले. तसेच आधीच्या गुन्ह्यात कलम ३७६, (२)(एन)सह पोटकलम पो.स्को. अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना १० आँक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती तपास अधिकारी संजय ठाकरे यांनी दिली. त्या अल्पवयीन मुलीवर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शारीरिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्याने पोलिस पथक घटनास्थळाच्या पंचनाम्यासाठी रवाना झाल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा