मोठी कारवाई! १० वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोरास ठोकल्या बेड्या

By अनिल गवई | Published: August 26, 2022 10:38 AM2022-08-26T10:38:16+5:302022-08-26T10:43:46+5:30

Crime News : निलेश उर्फ पिंटू सुरेश भगत असे जेरबंद करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे.

Crime News robber who was absconding for 10 years was arrested in khamgaon | मोठी कारवाई! १० वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोरास ठोकल्या बेड्या

मोठी कारवाई! १० वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोरास ठोकल्या बेड्या

googlenewsNext

खामगाव - वेगवेगळ्या ठिकाणच्या दरोडा प्रकरणातील एका ४० वर्षीय आरोपीला अप्पर पोलीस अधीक्षक पथकाने बेड्या ठोकल्या. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी परिसरातून शुक्रवारी पहाटे त्याला जेरबंद करण्यात आले.

निलेश उर्फ पिंटू सुरेश भगत असे जेरबंद करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. तो नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी परिसरातील एका धार्मिक संस्थानच्या परिसरात वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना मिळाली. या माहितीची खात्री पलटल्याने अप्पर पोलीस अधीक्षक पथकाचे पोलीस उपनिरिक्षक पंकज सपकाळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी सापळा रचला. 

अट्टल दरोडेखोर भगत याला अटक करण्यासाठी मलकापूर आणि नांदुरा पोलिसांची मदत घेण्यात आली.  नीलेश उर्फ पिंट्या याचा बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यामध्ये सहभाग होता. गेल्या दहा वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. परंतु, वेळोवेळी पोलिसांना चकमा देण्यात तो यशस्वी झाला होता. अखेर शुक्रवारी पहाटे निलेश उर्फ पिंट्याला अपर पोलीस अधिक्षक पथकाने बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
 

Web Title: Crime News robber who was absconding for 10 years was arrested in khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.