आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST2021-02-06T05:05:48+5:302021-02-06T05:05:48+5:30

सोयगाव येथील रमेश सूर्यभान सोनुने हा ३० जानेवारी रोजी फराळी चिवडा आणण्यासाठी जवळ असणाऱ्या जामठी गावात मोटारसायकलने गेला हाेता. ...

Crime of incitement to suicide | आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

सोयगाव येथील रमेश सूर्यभान सोनुने हा ३० जानेवारी रोजी फराळी चिवडा आणण्यासाठी जवळ असणाऱ्या जामठी गावात मोटारसायकलने गेला हाेता. यावेळी त्याच्या मोटारसायकलचा धक्का हा पप्पू खिरडकर यांच्या मोटरसायकलला लागून अपघात घडला हाेता. या अपघातात दुचाकीवरील पदमाबाई खिरडकर या जखमी झाल्या हाेत्या. यावेळी झालेला वाद जामठी ग्रामस्थांनी मिटवला होता. त्यानंतर तुकाराम गोविंदा रावळकर व दत्ता तुकाराम रावळकर यांनी रमेश साेनुने याच्या घरी जाऊन माझ्या भाचीला मोटरसायकलवरून धक्का देऊन का पाडले, यावरून मृतकास दिवसभरात तीन-चारवेळा मारहाण केली. या घटनेनंतर पश्चात्ताप व अपमान होऊन मृत रमेश सोनुने यांनी रमेश रावळकर यांच्या शेतातील मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी पाेलिसांनी दाेन्ही आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक नीलेश अपसुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सागर पेंढारकर व कर्मचारी करत आहेत.

Web Title: Crime of incitement to suicide