'त्या' तरूणांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: May 25, 2014 00:04 IST2014-05-24T23:36:00+5:302014-05-25T00:04:41+5:30
बेरोजगार तरुणांची लाखो रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी जॉबवर्क सेंटरच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल.

'त्या' तरूणांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा
बुलडाणा : अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी नासिर हुसैन बागवाला आणि त्याचा मुलगा युसूफ बागवाला यांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेरोजगार तरूणांच्या मानसिकतेचा फायदा घेत नासीर हुसेन बागवाला (वय ५0) व त्याचा मुलगा युसूफ बागवाला (वय २७) या पिता पुत्रांनी खामगाव रोडवरील सुंदरखेड येथील राजपूत यांची जागा भाड्याने घेऊन ह्यपरसेप्ट कॉम्प्युटर जॉबह्ण नावाची एक फर्म सुरु केली. कॉम्प्युटर जॉबवर्क करुन देणार्यास महिना २0 हजार रुपये कमविण्याची सुवर्णसंधी, अशी जाहिरात देऊन बेरोजगारांना आपल्याकडे आकर्षित केले. सुरुवातीच्या काळात जॉबवर्कच्या मोबदल्यात पैसे देऊन बागवालाने या तरुणांचा विश्वास संपादीत केला. त्यानंतर ज्यांच्याकडे जॉबवर्कसाठी कॉम्प्युटर व लॅपटॉप वाटप करु, असे सांगत या ठगांनी त्यासाठी २0 टक्के डिपॉझिट जमा करण्याचे या तरुणांना सांगितले. या आमिषाला भुलून अनेकांनी ६ हजारांपासून ते २४ हजारापर्यंत डिपॉजिट जमा केलेले आहे. १५ मे पर्यंत सर्वांकडून रक्कम जमा करुन घेण्यात आली व १७ मे ते २0 दरम्यान लिनोव्हा कंपनीचे कॉम्प्युटर व लॅपटॉप बुकींगनुसार वाटप करु, असे सांगून १५ मेच्या रात्री नासिर बागवाला व युसूफ बागवाला यांनी लाखो रुपये घेऊन बुलडाण्यातून पोबारा केला. याप्रकरणी जवळपास ६00-७00 तरूणांची फसवणूक झाली. याप्रकरणी नरेश सीताराम इंगळे रा.मोताळा यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज २४ मे रोजी आरोपी नासिर हुसेन बागवाला, युसूफ बागवाला यांच्याविरूद्ध भादंवि ४२0, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.