विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: April 12, 2017 01:05 IST2017-04-12T01:05:56+5:302017-04-12T01:05:56+5:30
मलकापूर : विहिरीत पडून महिलेच्या मृत्यूप्रकरणी मंगळवारी सासरच्या ६ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मृतकचे सासरे यांना अटक केली आहे.

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा
मलकापूर : विहिरीत पडून महिलेच्या मृत्यूप्रकरणी मंगळवारी मृतक महिलेच्या आईच्या फिर्यादीवरून सासरच्या ६ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मृतकचे सासरे यांना अटक केली आहे.
विवरा येथील सौ.रोहिणी सुनिल चोपडे (वय ३०) वर्ष या विवाहीतेचा मृतदेह शेतशिवारातील विहिरीत आढळून आल्याची घटना १० एप्रिल रोजी समोर आली. याप्रकरणी मृतक महिलेचे जेठ गजानन चोपडे यांच्या फिर्यादीवरून दसरखेड पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. तर मंगळवारी मृतक महिलेची आई सौ.लक्ष्मीबाई विलास वाघ रा.सिबाडी मार्ग बेलापूर नवी मुंबई यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनला मुलीच्या सासरकडील ६ जणांविरूध्द तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनला अप.नं.११/१७ कलम ३०४ ब, ३०६, ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. यामध्ये पती सुनिल अशोक चोपडे, सासरे अशोक रामा चोपडे, सासु आशा अशोक चोपडे, जेठ गजानन अशोक चोपडे, जेठाणी सौ.सुरेखा गजानन चोपडे, विवरा ता. मलकापूर तसेच नणंद सौ.संगीता वराडे रा.टाकरखेड ता. मोताळा यांचा समावेश आहे. महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीत उपरोक्त आरोपीतांनी संगनमत करून मृतक रोहिणीस नेहमीच माहेरहून दागदागिने व पैसे घेवून ये या कारणावरून तिला शारीरिक व मानसिक उडी घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येस आरोपींनीच तिला प्रवृत्त केले आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरून सासरकडील सहा जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हे दाखल करीत मृतकचे सासरे अशोक चोपडे यांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउनि मोहनसिंग राजपूत, पोहेकाँ सुभाष पहुरकर व नापोकाँ प्रमोद पोलाखरे करीत आहेत.