मारहाणप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:29 IST2021-07-25T04:29:02+5:302021-07-25T04:29:02+5:30
अंबादास एकनाथ इंगळे (वय ५०, रा. देऊळगाव मही) यांच्या विहिरीच्या बाजूला खड्डा खोदला असता अंबादास इंगळे यांनी आरोपींना समजावून ...

मारहाणप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा
अंबादास एकनाथ इंगळे (वय ५०, रा. देऊळगाव मही) यांच्या विहिरीच्या बाजूला खड्डा खोदला असता अंबादास इंगळे यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, एकाने त्याच्या हातातील लोखंडी कुदळच्या साहाय्याने अंबादास इंगळे यांच्या मुलास डोक्यावर मारून जखमी केले. यानंतर काही आरोपींनी काठीने मारहाण केली. याचबरोबर अंबादास एकनाथ इंगळे यांच्या कुटुंबावर आरोपींनी हल्ला चढविला व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अंबादास एकनाथ इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भानुदास एकनाथ इंगळे, प्रकाश भानुदास इंगळे, सतीश भानुदास इंगळे, चंद्रभागा भानुदास इंगळे, भारती सतीश इंगळे, देवीदास इंगळे, रंजना देवीदास इंगळे (सर्व रा. देऊळगाव मही) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल साळवे करीत आहेत.