विनयभंगप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:40 IST2021-03-01T04:40:48+5:302021-03-01T04:40:48+5:30
बुलडाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड भागात राहणारी ३८ वर्षीय तक्रारदार महिलेच्या घरी २७ फेब्रुवारी राेजी आरोपी महेंद्र पाटील ...

विनयभंगप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
बुलडाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड भागात राहणारी ३८ वर्षीय तक्रारदार महिलेच्या घरी २७ फेब्रुवारी राेजी आरोपी महेंद्र पाटील रा.बोदवड जि. जळगाव हा गेला हाेता. त्याने विवाहितेला फाेनवरून धमकी दिली, तसेच घरी जाऊन विनयभंग केला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बुलडाणा शहर पाेलिसांनी आरोपी महेंद्र पाटील विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकी अपघातात युवती जखमी
बुलडाणा : दुचाकीला कट मारल्याने १७ वर्षीय युवती जखमी झाल्याची घटना २८ फेब्रुवारी राेजी सायंकाळी घडली. सायली दीपक वाकोडे नामक युवती घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात युवकाने सायलीच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे सायली रस्त्यावर कोसळून जखमी झाली. दरम्यान, विशेष पोलीस अधिकारी प्रभाकर वाघमारे व पत्रकार जोशी यांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.