विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:15 IST2019-04-01T18:15:35+5:302019-04-01T18:15:40+5:30
खामगाव : तालुक्यातील सुटाळा बु.येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या मंडळीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पतीसह चौघांचा समावेश आहे.

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील सुटाळा बु.येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या मंडळीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पतीसह चौघांचा समावेश आहे.
सुटाळा बु. येथील सौ. अर्चना शिवानंद धुरंदर(२९) या महिलेचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला. तत्पूर्वी जळाल्याने अत्यवस्थ झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. याप्रकरणी मृतक महिलेचे वडील गणेश इंगळे यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत पती आणि सासरच्या मंडळी आपल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे नमूद केले. सततच्या त्रासामुळेच मुलीने जाळून घेत आत्महत्या केली. दरम्यान, घरगुती वाद आणि मारहाणीमुळे दाखल प्रकरणात कोर्टाच्या मध्यस्थीने आपली मुलगी पुन्हा नांदावयास गेली होती. आपल्या मुलीला सासरच्यांनी चांगले वागविण्याची हमी दिल्यानंतरच तिला सासरी पाठविले होते. मात्र, तरीही देखील सासरच्या मंडळीकडून त्रास देण्यात आला. त्यामुळे तिने जाळून घेतले, अशा तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी मृतक महिलेचा पती शिवानंद धुरंदर, सासू जिजाबाई धुरंदर, नंणद माया गवई, दिर रामानंद धुरंदर यांच्या विरोधात भादंवि कलम ३०६, ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.