दागिन्याचा हव्यासापोटी चुलत सासूचा काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:38 IST2021-09-21T04:38:10+5:302021-09-21T04:38:10+5:30

लोणार तालुक्यातील भुमराळा येथील वृद्ध महिला कासाबाई नारायण चौधरी (६५) ही महिला स्वतः च्या शेतात काम करत हाेती़ ...

Cousin's fork removed for the sake of jewelry | दागिन्याचा हव्यासापोटी चुलत सासूचा काढला काटा

दागिन्याचा हव्यासापोटी चुलत सासूचा काढला काटा

लोणार तालुक्यातील भुमराळा येथील वृद्ध महिला कासाबाई नारायण चौधरी (६५) ही महिला स्वतः च्या शेतात काम करत हाेती़ यावेळी शेताशेजारी शेत असलेल्या नंदाबाई उद्धव चौधरी हिने सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मोहापायी वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केला होता. वृद्ध महिलेचा खून झाल्याचे १९ सप्टेंबरला उघडकीस आले हाेते़ या घटनेची फिर्याद पोलीस स्टेशन बिबी येथे दाखल होताच ठाणेदार एल. डी. तावरे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची माहिती वरिष्ठांना कळवताच जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळिराम गिते यांच्यासह ठसेतज्ज्ञ व श्वानपथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार एल. डी. तावरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जिद्दमवार, शेळके, पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड, पोलीस उपनिरीक्षक जायभाये , पोलीस अंमलदार मोहम्मद परशुवाले, अरुण सानप,जगदेव टेकाळे, शिवाजी दराडे, यशवंत जैवळ यांनी अवघ्या १२ तासांत खुनाच्या आरोपीस अटक करून घटनेतील मुद्देमाल हस्तगत केला आहे. मृत महिलेचा नातू मधुकर दत्ता मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नंदाबाई उद्धव चौधरी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Cousin's fork removed for the sake of jewelry