शौचालयाच्या बांधकामात भ्रष्टाचार
By Admin | Updated: June 5, 2014 22:37 IST2014-06-05T22:36:39+5:302014-06-05T22:37:17+5:30
बोराखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शौचालयाच्या बांधकामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप.

शौचालयाच्या बांधकामात भ्रष्टाचार
मोताळा: बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनआरएचएम अतंर्गत बांधकाम करण्यात येत असलेल्या शौचालयात भ्रष्टाचार होत असून, जिल्हा आरोग्य अधिकार्याकडे दोन वेळा तक्रार देवूनही कोणत्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळे भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे शहर उपप्रमुख शिवाजी चहाकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांचेकडे ४ जून रोजी तक्रार देवून चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीत नमुद आहे की जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनआरएचएम अतंर्गत शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामात गंभीर स्वरूपाच्या त्रृट्या असून शौचालयाचे शोष टाक्य़ाचे बेड काँक्रीटीकरण हे निकृष्ट व खडीकरण न करता केल्या गेले आहे. शौचालयाच्या टक्य़ावरील मधला स्लॅबची जाडी कमी-अधिक असल्यामुळे स्लॅब पडण्याचा धोका असून टाक्य़ात पाणी साचल्या जात नाही. शौचालयाच्यावरील स्लॅबचेसुद्धा काम निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे भविष्यात त्याचा त्रास आरोग्य केंद्रात येणार्या रूग्णांना होवू शकतो. शौचालय बांधकामातील या गंभीर त्रृट्यांमध्ये संबधीत ठेकेदार, अभियंता यांचा दोष असून त्यांना चिरीमिरी देवून काम करवून घेणार्या अधिकार्यांवरसुद्धा कडक कारवाई करावी व ठेके दाराचे बिल थांबवून त्याचे रजिष्ट्रेशन रद्य करावे असेही तक्रारीत नमुद आहे.