शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नगरसेवक राकेश राणासह चार जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:08 AM

खामगाव: पैशाच्या वादातून मारहाण व सावकारीप्रकरणी नगरसेवक राकेश राणासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपैशाच्या वादातून मारहाण व सावकारी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: पैशाच्या वादातून मारहाण व सावकारीप्रकरणी नगरसेवक राकेश राणासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकबरखान हा काही महिन्यापूर्वी राकेश राणा यांच्याकडे काम करीत असे. त्यावेळी अकबरखान याने काही खासगी कामानिमित्त राकेश राणा यांच्याजवळून १५ हजार रुपये कर्ज घेतले होते. यानंतर रविवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी मद्यपान करून तो गौरव टेन्ट हाऊसमध्ये आला होता. यावेळी त्याने गौरव राणा याला आणखी पैसे मागितले असता मागील १५ हजार रुपये दिल्याशिवाय आणखी कर्ज देणार नाही, असे राकेश राणा यांनी सांगितले. त्यामुळे चिडून त्याने दुकानाच्या एका काचेवर मोबाइल फेकला आणि त्यानंतर त्वेशाने जाऊ लागला असता ओट्याजवळ खाली पडला. यानंतर प्रेम रेसिडेन्सी येथे रात्रीच्या वेळी राकेश राणा यांची भेट घेतली व त्याच्यासोबत बराच वेळ चर्चा केली. यावेळी काही जण उपस्थित होते. यावेळी वाद होऊन मारहाण झाल्याचे समजते. तर या प्रकरणी अकबरखान यांची पत्नी फरकंदाखान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये राकेश राणा, गौरव राणा, राहुल कळमकार व आनंद सेवक सर्व रा. दाळफैल यांच्याविरुद्ध कलम ३२५, ३२४, ३८४, ३४ भादंविसह क महाराष्ट्र सावकारी अधिनियम २0१४ क ३९, ४५ नुसार गुन्हा दाखल केला.  तसेच रात्री राकेश राणा व राहुल कळमकार यांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपी फरार आहेत. यावेळी मारहाणीत जखमी झाल्याने अकबर खान याला उपचारार्थ अकोला येथे पाठविण्यात आलेले आहे. तर रात्रीच्या वेळेस शहर पोलीस स्टेशन व सामान्य रुग्णालय परिसरात अल्पसंख्याक समाजबांधवांची गर्दी झाली होती.-

टॅग्स :Crimeगुन्हा